भाजपच्या ‘या’ खासदारांना दुस-यांदा कोरोना

प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा कोरोनाची लागण,प्रकृृती स्थिर

Nanded BJP MP Pratap Patil Chikhalikar Again tested Corona Positive
प्रताप पाटील चिखलीकर कोरोना पॉझिटिव्ह Nanded BJP MP Pratap Patil Chikhalikar Again tested Corona Positive

नांदेड : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यातच त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Nanded BJP MP Pratap Patil Chikhalikar Again tested Corona Positive)

प्रताप पाटील चिखलीकर यांना 7 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली आहे. त्यापूर्वी त्यांच्या मुलाची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले होते.

मात्र पुन्हा महिन्याभरात प्रताप पाटील चिखलीकरांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या दिल्लीतील निवासस्थानी वास्तव्यास आहेत. माझी प्रकृती उत्तम असल्याचा माहिती चिखलीकरांनी दिली आहे.

दरम्यान, मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही कोरोना पॉझिटिव्ह आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here