National Unemployment Day l #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हॅशटॅग चर्चेत; मोदी हे तरुणांना बेरोजगार बनवणारे पंतप्रधान

narendra-modi-birthday-congress-observe-national-unemployment-day-news-update
narendra-modi-birthday-congress-observe-national-unemployment-day-news-update

नवी दिल्ली l युथ काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७१ वा वाढदिवस (Narendra Modi Birthday) राष्ट्रीय बेरोजगार दिवस (National Unemployment Day) म्हणून साजरा केला जात आहे. १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भातील आवाहन काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांकडून गुरुवारपासूनच केली जात होती. त्याचा परिणाम आज म्हणजेच मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिसून येत असून #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस या हॅशटॅगवर दीड लाखांच्या आसपास ट्विट सकाळी आठ वाजेपर्यंत करण्यात आले आहेत.

मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून २१ दिवसांचं सेवा आणि समर्पण अभियान सुरु करण्यात आलं असून त्यालाच विरोध करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलीय. कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून बेरोजगारीसारखा मुद्दा मोदींच्या वाढदिवसानिमित्त चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला जातोय.

“बेरोजगारी वाढल्याने लाखो तरुणांवरील ताण वाढलाय. इंडियन युथ काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणार आहे,” अशी घोषणा युथ काँग्रेसने केलीय. करोना काळावधीमध्ये ३२ लाख पगारी व्यक्तींनी रोजगार गमावला असून मोदींचे श्रीमंत मित्र अधिक श्रीमंत होत आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. “पकोडानॉमिक्स पुरे झालं आता येथील तरुणांना खरोखर नोकऱ्यांची गरज आहे,” असा टोलाही युथ काँग्रेसने लगावला आहे.

युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी ट्विटरवरुन आजचा दिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन करताना, “१७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिवस, निमित्त आहे कोट्यावधी तरुणांना बेरोजगार बनवणाऱ्या भारताच्या युवाविरोधी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस,” असं ट्विट केलं आहे.

युथ काँग्रेस जारी केलेल्या पत्रकामध्ये बेरोजगारीचा दर हा २.४ वरुन १०.३ पर्यंत वाढल्याचा दावा केलाय.

१)

२)

३)

४)

५)

जुमला दिवस हा हॅशटॅगही आज चर्चेत असल्याचं ट्विटरवर दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here