नवी मुंबईत ‘क्लब नशा’ पब सील; पब चालकांचे धाबे दणाणले

navi-mumbai-club-nasha-in-vashi-sealed-by-nmmc-and-police-for-violating-corona-rules-news-updates
navi-mumbai-club-nasha-in-vashi-sealed-by-nmmc-and-police-for-violating-corona-rules-news-updates

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी येथे पाम बीच गॅलरीयामधील क्लब नशा पबला महापालिकेकडून Navi Mumbai Club Nasha In Vashi Sealed सील करण्यात आले आहे. कोरोना काळात सातत्याने नियमांचे उल्लंघन केल्याने या पबवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पब चालकांचे धाबे दणाणले आहे. Navi Mumbai Club Nasha In Vashi Sealed By NMMC And Police For Violating Corona Rules.

या पबमध्ये शनिवार 6 मार्च रोजी पार्टीत तरुण-तरुणींकडून दारूचं सेवन करण्यात आलंय. ज्यामध्ये अल्पवयीन मुलेही असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक बस्त आणि एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगुडे यांनी या पबवर धाड टाकली.

धाडीत 150 ते 200 तरुण-तरुणी ताब्यात

या धाडीत 150 ते 200 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. आढळलेल्या तरुणांना ताब्यात घेऊन पब मालकावर कारवाई करण्यात आली आहे. एका बाजूला नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई महापालिका जीवाचं रान करुन कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पबमध्ये धांगडधिंगा सुरु होता.

सामाजिक अंतर न पाळणे तसेच मास्क न वापरणे अशा दोन्ही नियमांचे उल्लंघन केले गेले. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला होता. याबाबत पोलिसांनी तुर्भे विभाग अधिकाऱ्यांना पत्रही दिले होते त्याआधारे हा पब सील करण्याची कारवाई करण्यात आली. तर पुढील आदेश येईपर्यंत हा पब बंद राहणार असल्याचेही सांगितले.

हेही वाचा: अजितदादा कौतुकास पात्र; शिवसेनेनं थोपटली पाठ!

मागील आठवड्यापासून पोलीस आणि महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असताना देखील पब मालक अशा करवायांना धजावत नसल्याने आता नवी मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात कोरोनाचे नियम तोडणाऱ्या 500 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मास्क न घालणाऱ्या 10 हजार नवी मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: Indian Railways: यात्रीगण ध्यान दें, रेलवे से संबंधित किसी भी समस्या या जानकारी के लिए करें अब इस नंबर पर डायल

नवी मुंबई पोलिसांच्या रडारवर आता नियम तोडणारे पब आणि डान्सबार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळातही पोलिसांकडून अशीच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here