कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही;राष्ट्रवादीचा भाजपाला टोला

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा भाजपा नेत्यांना टोला

ncp-minister-nawab-malik-press-conference-fletcher-patel-ncb-news-update
ncp-minister-nawab-malik-press-conference-fletcher-patel-ncb-news-update

मुंबई l कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही” अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रवादी मुंबईचे अध्यक्ष अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab-Malik यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टोलेबाजीनंतर भाजपा नेते तुटून पडले. भाजप नेते नारायण राणे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर,राम कदम यासह भाजपाचे इतर नेत्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरु केली. या टीकेला मंत्री नवाब मलिक Nawab-Malik यांनी उत्तर दिले आहे.

प्रत्येकाने मर्यादेत राहून भाषेचा वापर केला पाहिजे

भाजपाचे काही नेते मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरत आहेत आणि एक मंत्री तुरुंगात जाणार असल्याचे भाकीत करत आहेत, हे बोलणं योग्य नाही असे नवाब मलिक Nawab-Malik म्हणाले.

वाचा l Raghuram Rajan l ”अन्यथा देशातील तरुण रस्त्यावर उतरतील”; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला इशारा

सभ्य समाजात आणि राजकारणात असंसदीय शब्दांचा प्रयोग होत असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाने मर्यादेत राहून भाषेचा वापर केला पाहिजे, असा सल्ला देखील मलिक यांनी दिला आहे.

धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही

महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांची विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही. धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही.

वाचा l भाजप वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत? संजय राऊतांचा सवाल

भाजपा धर्माच्या आधारावर राजकारण करुन मतांचे राजकारण करते हे लोकांना माहित आहे, असं देखील नवाब मलिक Nawab-Malik यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी सत्य परिस्थितीचा भाजपाला आरसा दाखवला

शिवसेना आणि भाजप या दोघांच्या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्य परिस्थितीचा भाजपाला आरसा दाखवला आहे. वेगवेगळे भाष्य करुन भाजपा जनतेची दिशाभूल करण्याचे काम कसे करते, हे दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचेही नवाब मलिक Nawab-Malik म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here