Nawab Malik: नवाब मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करून म्हणाले…

nawab-malik-serious-allegation-of-recce-of-house-tweet-some-photos-news-update
nawab-malik-serious-allegation-of-recce-of-house-tweet-some-photos-news-update

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्वीट करत खळबळजनक आरोप केला आहे. मागील काही दिवसांपासून गाडीत बसलेले लोक माझे घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत, असा आरोप नवाब मलिकांनी केला. या संशयितांचे फोटोही ट्वीट केले. यावेळी नवाब मलिकांनी या फोटोतील लोकांना कुणी ओळखत असेल तर माहिती देण्याचंही आवाहन केले आहे.

नवाब मलिक म्हणाले, “या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.”

नवाब मलिक यांनी ट्वीट केले फोटो

?

नवाब मलिक यांनी एकूण ५ फोटो ट्वीट केले आहेत. यात एका कारमध्ये दोन व्यक्ती बसलेले दिसत आहेत. त्यातील एक गाडी चालवत आहे, तर दुसरा मागच्या बाजूला बसला आहे. मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने मास्क घातलेला दिसत आहे. तसेच त्याच्या हातात कॅमेरा देखील दिसत आहे.

नवाब मलिक यांनी या ५ फोटोंमध्ये एक फोटो गाडीचाही ट्वीट केलाय. त्यात गाडीचा क्रमांकही दिसतो आहे. मात्र, हे फोटो नेमके कुणाचे आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here