औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे नवर्निवाचीत शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन आणि माजी शहराध्यक्ष विजय साळवे यांच्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी दोन बैठका झाल्या. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणा-या काळात अंतर्गत वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी रविवारी राष्ट्रवादी भवन मध्ये बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष विजय साळवे यांना मुदतीपूर्वी अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह मदनी चौक येथे बैठक संपन्न झाली.
एकाच दिवशी आजी माजी अध्यक्षांच्या बैठका झाल्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली आहे. या बैठकीमध्ये नाराज कार्यकर्त्यांनी पुढील भूमिका काय घ्यायची याबाबत चर्चा केली. काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भूमिकेवरून संताप व्यक्त केला.
सर्वांना सोबत घेऊ पुढे जाऊ
ख्वाजा शरफोद्दीन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एकत्र घेऊन चालण्याचे आश्वासन दिले. पक्षात जे असंतुष्ट आहेत त्यांना संतुष्ट करु. पक्षामध्ये चांगल्या चारित्र्याच्या लोकांनाच पदे दिली जातील. सर्वांना मिळून पक्षाचे काम करायचे आहेत. त्यासाठी गटबाजी चालणार नाही. महापालिक निवडणुकीच्या अनुषंगाने चांगली तयारी करावी लागेल. आमचे पाच वर्ष खूप वाईट गेले. सगळ्यांचे कामे करु, असे ख्वाजा शरफोद्दीन यांनी सांगितले. तर जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आले पाहिजे यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल. असे आवाहनही ख्वााजा शरफोद्दीन त्यांनी बैठकीत केले.
विजय साळवे राष्ट्रवादी सोबतच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी उभा केला आहे. सक्षम नेत्यांच्या खांद्यावर पक्ष उभा आहे. त्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. मला त्याचा अभिमान आहे. बैठकीला जमलेले कार्यकर्ते माझे समर्थक नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. पक्षावर निष्ठा असलेले कार्यकर्ते आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार आहोत,असे विजय साळवे यांनी सांगितले.
शरद पवार अजित पवारांना भेटू
राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलना यांनी सांगितले की,पक्षाने निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. सर्व समाजाच्या लोकांना जोडण्याचे काम विजय साळवे यांनी केले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पदावरुन हटविल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जे नाराज होते त्यांना बोलावून बैठक घेतली. जो काही निर्णय झाला तो अंतिम नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवारांना भेटून मार्ग काढू.असे आश्वासन कदीर मौलाना यांनी दिले.
हेही वाचा
Infinix Note 11 सिरीजचं 13 डिसेंबरला लाँचिंग, नवीन स्मार्टफोनमध्ये काय असेल खास?