
औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Maharashtra President) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) नुकतेच औरंगाबादेत येऊन गेले. गौरव सोहळ्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काही प्रमुख पदाधिका-यांची त्यांनी रेल्वेस्टेशन येथील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीत विजय साळवे (vijay Salve) यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. त्याच बैठकीत जयंत पाटलांनी साळवेंचा करेक्ट कार्यक्रम केला. अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे.
विजय साळवे गेल्या अडीच वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहात होते. त्यांच्या विरोधात विविध आंदोलने,पक्षप्रवेश तसेच कार्यकर्त्या अभियान जोडण्यात आले. परंतु त्यांच्या विरोधात तक्रारींचीही बरीच मोठी लिस्ट होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष जयसिंगराव गायकवाड यांनी विजय साळवेंच्या विरुध्द दंड थोपटले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती.
जयंत पाटील हे औरंगाबादेत आले असताना त्यांनी रेल्वेस्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये प्रमुख पदाधिका-यांची गुप्त बैठक घेतली. या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, वक्ता सेलचे प्रकाशदादा सोळुंके, जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, प्रदेश सचिव मुश्ताक अहेमद, ख्वाजा शरफोद्दीन, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा अंकिता विधाते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष शेख कय्युम, विद्यार्थी अध्यक्ष मयुर सोनवणे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष विलास मगरे यांची उपस्थिती होती.
जयसिंगराव गायकवाड काय म्हणाले बैठकीत
घर घर चलो अभियान कार्यक्रम मी घेतला. त्यावेळी विजय साळवे हे शहराध्य या नात्याने कार्यक्रमापासून लांब होते. त्यांनी मला साथ दिली नाही. जुन्या नेत्यांना पक्षामध्ये डावलले जात आहे. पक्षात एअरपोर्ट नेते आहेत. पदे घेऊन चार चार दिवस मुंबईत राहतात. त्यामुळे औरंगाबादेत पक्ष वाढत नाही. पक्षामध्ये जुन्या लोकांना बाजूला करुन पक्षात नवीन लोकांना संधी दिली जाते. त्यामुळे आज पक्षाचे नुकसान होत आहे. हे सर्व मांडल्यानंतर लेखी तक्रारीनंतर जयंत पाटलांनी यातील ५० टक्के गोष्टी ख-या असू शकतात. याचा विचार होईल असे सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी तडकाफडकी विजय साळवेंना पदमुक्त करण्यात आले.
विजय साळवेंचा फोन होता बंद
जयंत पाटील शहरात असताना विजय साळवे यांनी एअरपोर्टवर सत्कार करुन तेथून निघून गेले होते. त्यानंतर संध्याकाळी बैठकीत उपस्थित नव्हते. त्यांना बैठकीतून फोन करण्यात आले त्यावेळी त्यांचा फोन बंद होता. अशीही चर्चा सुरु आहे.
[…] […]