“एक-दोन उद्योग गेल्यानं…,राज ठाकरेंच्या विधानावर अजित पवार संतापले; म्हणाले, “मग मुलांनी…”

Ncp-leader-ajit-pawar-replay-raj-thackeray-statement-one-two-project-going-out-maharashtra-not-difference-news-update-today
Ncp-leader-ajit-pawar-replay-raj-thackeray-statement-one-two-project-going-out-maharashtra-not-difference-news-update-today

मुंबई: शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रातून उद्योग परराज्यात गेल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सातत्याने करण्यात येतो. पण, याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यानं काहीही नुकसान होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. ते पिंपरीत सुरु असलेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात बोलत होते.

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणं, हे अतिशय चुकीचं आहे. त्यातून बेरोजगारी, बेकारी प्रचंड वाढत आहे. असे असताना मग मुलांनी काम कुठं मागायचं. लाखो कोटी रुपयांचं प्रकल्प गेल्याने रोजगार बुडाला आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

 “राज्यातून गेलेल्या प्रकल्पावरून राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन तेथील भागात रोजगार निर्माण होतील,” असं अजित पवारांनी म्हटलं.

 काय म्हणाले राज ठाकरे?

“महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टीकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे”, असं राज ठाकरे म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here