‘शरद पवारांना काँग्रेस अध्यक्षपद द्या’! ‘या’ नेत्याने दिला सल्ला

Ncp-merge-in-congress-and-make-sharad-pawar-congress-president-suggest-ramdas-aathawle
Ncp-merge-in-congress-and-make-sharad-pawar-congress-president-suggest-ramdas-aathawle

मुंबई :  शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा. त्यांनाच काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद देण्यात यावं, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.     

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून दोन गट पडले आहेत. काँग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्या आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. यावरुन काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. या सर्व घडामोडींवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी हा सल्ला दिला आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेसचं अध्यक्षपद स्विकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे ही सूचना करत असल्याचं आठवले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचं  काँग्रेसमध्ये विलिनीकरण करुन घ्या अशी अधून मधून चर्चा घडत असते. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात ही चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असते. सध्या काँग्रेस अध्यक्षपदाचा विषय दिल्ली दरबारी अडकून पडला आहे.

भाजपाचे नेते नेहमीचं गांधी कुटुंबियांच्या अध्यक्षपदावरून टीका करत असतात. काँग्रेस अध्यक्षपदावरून नेहमीच जोरदार चर्चा होत असते. आता भाजप सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या नावाचा प्रस्ताव समोर आणल्यामुळे जोरदार चर्चा रंगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here