Jayant Patil l जयंत पाटलांचे डॉ. बाबासाहेब आंडेकरांना पत्र, वाचा जसेच्या तसे

कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा घरूनच अभिवादन

Ncp minister-jayant-patil-tribute-letter-to-dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-day
Ncp minister-jayant-patil-tribute-letter-to-dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-day

मुंबई l भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांचा आज 6 डिसेंबर 64 वा महापरिनिर्वाण दिन Mahaparinirvan Din आहे. देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत. असं पत्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आहे.  

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर  Chaityabhoomi अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन करा, असे आवाहन काही सामाजिक संस्थांकडून अनुयायांना करण्यात आलं आहे. Jayant Patil Tribute Letter to Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day

या सूचनेचं पालन करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातील मजकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.

वाचा जयंत पाटील यांचे पत्र  

प्रिय बाबासाहेब,

“देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत.म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.

हेही वाचा l Ravi Patwardhan l हरहुन्नरी कलाकार रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!,” असे जयंत पाटील यांनी पत्रात लिहिले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here