भाजपा आणि ड्रग्ज पेडलरच्या नात्यांबद्दल बोलूयात…;नवाब मलिकांनी शेअर केला अमृता फडणवीसांचा फोटो

ncp-minister-nawab-malik-alleged-bjp-and-drug-peddler-connection-by-sharing-photo-of-bjp-ex-cm-devendra-fadnavis-wife-amruta-fadnavis
ncp-minister-nawab-malik-alleged-bjp-and-drug-peddler-connection-by-sharing-photo-of-bjp-ex-cm-devendra-fadnavis-wife-amruta-fadnavis

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज सकाळी ट्विटरवरुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मलिक यांनी भाजपा (BJP) आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे.

“चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलाय

निशांत वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो शेअर करुन भाजपचं ड्रग्स नेक्सस असं म्हटलं आहे. हा फोटो अमृता फडणवीस यांचा असून यामध्ये ‘जयदीप चंदूलाल राणा’ असल्याचा दावा निशांत वर्मा यांनी केली आहे. त्यांच्या मते, जयदीप राणा हा एक ड्रग्स पेडलर असून त्याला जून 2021 मध्येच अटक करण्यात आली होती.

निशांत वर्मा यांचा नेमका काय आरोप?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला असून त्यांच्यासोबत जयदीप चंदूलाल राणा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निशांत वर्मा यांच्या मते, ‘जयदीप राणा हा एक ड्रग्स पेडलर असून त्याला जून 2021 मध्ये एनसीबीने अटक केली आहे. जो अद्यापही तुरुंगातच आहे. अशावेळी भाजपचं त्याच्या नेमकं कनेक्शन काय?’ असा सवाल विचारत निशांत वर्मा यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

कोण आहेत निशांत वर्मा?

निशांत वर्मा हे स्वत:ला राष्ट्रीय राजकीय विश्लेषक असल्याचं सांगतात. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर देखील त्यांनी असंच म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या ट्विटर अकाउंट पाहिल्यास एक लक्षात येईल की, ते भाजपविरोधात अनेक वक्तव्य करतात. तसेच भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर देखील सातत्याने टीका करत असल्याचं दिसून आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here