Nawab Malik: नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; मनी लाँड्रिंग प्रकरणात ६ महिन्यांसाठी जामीन केला मंजूर

ncp-mla-nawab-malik-granted-6-months-bail-by-supreme-court-in-money-laundering-case-news-marathi-update-today
ncp-mla-nawab-malik-granted-6-months-bail-by-supreme-court-in-money-laundering-case-news-marathi-update-today

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लाँन्ड्रीग प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांना सहा महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय आधारावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नवाब मलिक हे दोन महिन्यांच्या जामिनावर बाहेर आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन ६ महिन्यांनी वाढवला आहे. वैद्यकीय आधारावर हा जामीन देण्यात आला आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी २०२२ पासून तुरुंगात होते. परंतु, तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचारासाठी त्यांना २ महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी जामीनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांची ही मागणी मान्य करत सहा महिन्यांसाठी जामीन दिला आहे.

 मलिकांना आधी दिलेल्या जामीनाचा कालावधी संपुष्टात येताच नवाब मलिक यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत अंतरिम जामीन वाढवून मिळावा अशी मागणी केली. नवाब मलिक यांच्या मुत्रपिंडाच्या आजाराबाबत तसेच त्यांच्या वैद्यकीय अहवालाबाबतचे तपशीलही न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आला होता. त्यानंतर खंडपीठाने मलिकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्याने अंतरिम जामिनाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here