केंद्राचं पथक आत्ता राज्यात म्हणजे पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Ncp-mla-rohit-pawar-warns-youth-about-government-report-containing-a-detailed-toolkit-for-media-management
Ncp-mla-rohit-pawar-warns-youth-about-government-report-containing-a-detailed-toolkit-for-media-management

मुंबई l दोन महिन्यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे farmer-issue झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी  येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं असला प्रकार आहे. असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार NCP MLA रोहित पवार Rohit pawar यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करु नये. आता पथक नको तर मदत पाठवा असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्राचं पथक राज्यात आत्ता पाहणीसाठी येतं आहे. राज्यातील अतिवृष्टीला दोन महिने उलटून गेले आहेत. त्यानंतर केंद्राचं पथक पाहणीसाठी येतं आहे यावरुन आता रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं; शेट्टींचा मोदींना टोला  

 असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. इतकंच नाही तर दोन महिन्यांनी येणाऱ्या केंद्रीय पथकावरही त्यांनी टीका केली आहे.

“महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिने सहा दिवसांनी केंद्रीय पथक आलं आहे. आता शिवारात जाऊन ते काय बघणार? शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून पैसे घेऊन जमिनीची साफसफाई करुन हरभरा, ज्वारीची पेरणी केली आहे.

हेही वाचा : लंडनहून भारतात येणारी विमानसेवा रद्द,कोरोनाच्या नव्या प्रकारची दहशत

या पिकाकडे बघून पथक म्हणेल  फसल तो बहुत अच्छी है इनको मदत करनेकी जरुरत नहीं” असं म्हणत राजू शेट्टींनी केंद्रीय पथकावरही टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र केंद्राकडून पथक आलं नाही. यानंतर आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी पथक आलं आहे. त्यावरुन राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पथकावर टीका केली आहे.

 हेही वाचा : भाजपानं दहा जागा जिंकल्या, तर ट्विटर सोडेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःचा उल्लेख चौकीदार असा करतात. त्यावरुन राजू शेट्टी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. एवढंच नाही केंद्राच्या पथकालाही त्यांनी टोला लगावला आहे. दोन महिन्यांनी हे पथक आलं आहे ते शिवारात जाऊन काय बघणार असाही टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात उद्यापासून 15 दिवस रात्रीची संचारबंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here