रोहित पवारांकडून औरंगाबाद नामांतराच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले सर्वांनी निर्णयाच्या मागे उभे राहण्याची गरज

Ncp-mla-rohit-pawar-criticizes-eknath-shinde-government-over-renaming-of-aurangabad-city-news-update-today
Ncp-mla-rohit-pawar-criticizes-eknath-shinde-government-over-renaming-of-aurangabad-city-news-update-today

मुंबई: केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयएमने या निर्णयाला विरोध केला आहे. आम्ही भविष्यातही याचा विरोधच करू, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या याच निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (२५ फेब्रवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

 भावनिक राजकारण केलं जात असेल तर…

सरकारने घेतलेलल्या या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र फक्त नामांतराच्या मुद्द्याकडेच लक्ष देणे चुकीचे आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत. “नामांतराच्या मुद्द्यात राजकारण न आणता आपण सर्वांनी या निर्णयाच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. मात्र नामांतर हाच मुद्दा आपण सतत घेत राहिलो तर बेरोजगारी, शेतकरी, मजूर शहरी आणि ग्रामीण भागातील असंघटित क्षेत्र यांच्याकडे दुर्लक्ष होईल. भावनिक राजकारण केलं जात असेल तर आपण सर्वांनी त्याचा विरोध केला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

 आमचा विरोध फक्त नामांतराला आहे- इम्तियाज जलील

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. भविष्यातही आम्ही नामांतराला विरोध करू, असे जलील म्हणाले. “नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. आमचा विरोध फक्त नामांतराला आहे. आमचा छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध नाही. भविष्यताही त्यांच्या नावाला विरोध करणार नाही. आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचाच आदर करतो,” असे जलील म्हणाले आहेत.

हेही वाचा: औरंगाबाद शहराच्या नामांतरावर इम्तियाज जलील यांचे मोठे विधान; म्हणाले, “विरोध करत राहणार, आम्ही…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here