केंद्राप्रमाणे कंपन्या विकून राज्याला पैसे मिळत नाहीत; राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटलांना उत्तर

चंद्रकांत पाटलांनी राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची केली होती मागणी

Ncp-mla-rohit-pawar-reply-to-chandrakant-patil-on-petrol-price-hike-news-update
Ncp-mla-rohit-pawar-reply-to-chandrakant-patil-on-petrol-price-hike-news-update

मुंबई l कोरोना काळत सामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्याची प्रक्रिया सुरूचं आहे. या महिन्यात 16 वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल २९ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी प्रतिलिटर महागले आहे. दरम्यान, पेट्रोल दरवाढीवरून आता राजकारण देखील पेटले आहे. सत्ताधारी केंद्र सरकारवर टीका करत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी केली होती. याला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.Ncp-mla-rohit-pawar-reply-to-chandrakant-patil-on-petrol-price-hike-news-update

रोहित पवार म्हणाले, “राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी काल राज्यातील भाजपच्या एका नेत्याने केली. पण २०१४ च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी २०१४ च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज ३५०% नी वाढलाय.

हेही वाचा : EPFO खातेदारांसाठी १ जूनपासून PF अकाऊंटवर लागू होणार ‘हे’ नियम

आज पेट्रोलवर केंद्राचा ३२.९० रुपये तर राज्याचा २८.३५ रुपये कर आहे. असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी रूपयाची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे”

हेही वाचा : EPFO खाताधारकों के लिए बड़ी खबर! 1 June से PF अकाउंट पर लागू होगा ये नियम

 चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते…
“जागतिक स्तरावर इंधनाची दरवाढ झाल्यामुळे देशातही दरवाढ होत आहे. काही राज्यांनी आपले कर कमी केल्याने तेथे दर कमी आहेत. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. त्यांनी टीका करू नये,” असे चंद्रकात पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा : आधार कार्डमध्ये आपला फोटो बदलायचाय? जाणून घ्या ही प्रक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here