शरद पवारांनी मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावरून एकाच शब्दात उत्तर दिले, म्हणाले…!

शरद पवार औरंगाबाद मुक्कामी,रविवारी रात्री मुंबईला होणार रवाना

ncp-president-sharad-pawar-expressed-his-stance-on-rss-chief-mohan-bhagwat-statement-aurangabad news update today
ncp-president-sharad-pawar-expressed-his-stance-on-rss-chief-mohan-bhagwat-statement-aurangabad news update today

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr.Mohan Bhagwat) यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. ‘मधल्या काळात मनुष्याने मान खाली घालावी, अशा पद्धतीने आपण आपल्याच लोकांना वागवले, हेदेखील खरं आहे. या चुका आपण कबूल करायला हव्यात. चुका कबूल केल्याने आपले पूर्वज निकृष्ट ठरत नाहीत. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांचे, पापाचे क्षालन करायलाच हवे,’ असं मोहन भागवत यांनी ब्राह्मण समाजाला उद्देशून म्हटलं. याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवारांना (Sharad Pawar) विचारले असता पवारांनी एकाच वाक्यात उत्तर दिले. पवार हसत हसत म्हणाले… एवढ्यात भागेल? एवढ पुरेस आहे का? मग पत्रकरांनी विचारले काय करायला पाहिजे. त्यावर पवार हसत हसत निघून घेले. यावेळी उपस्थित नेत्यांना, पत्रकारांनाही हसू आवरता आले नाही.

शरद पवार हे शनिवारी रात्री औंरंगाबादेत दाखल झाले. यावेळी चिकलठाणा विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पवार पत्रकारांशी जास्त न बोलता निघून गेले. रविवारी सकाळी बीड जिल्ह्यात कार्यक्रमासाठी पवार  रवाना होणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब व इतर नेते उपस्थित राहणार आहेत. 

राहुल गांधी यांना सावरकारंबद्दल जे विधान केले त्याबद्दलही शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता पवारांनी त्या बाबत बोलणे टाळले. पवार म्हणाले राहुल गांधी काय म्हणाले मी ऐकले नाही. असे सांगून बोलणे टाळले. यावेळी आमदार सतीष चव्हाण, जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष ख्वॉजा शरफोद्दीन, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. मयूर सोनवणे, मध्यचा महिला कार्याध्यक्षा शकिला खान, राष्ट्रवादी पूर्व मतदारसंघाचे कार्याध्यक्ष जावेद खान यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी स्वागतासाठी उपस्थित होते.

राहुल गांधी सावरकरांबद्दल बद्दल काय म्हणाले होते?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करणार आहेत. सध्या ही यात्रा कर्नाटकमध्ये असून यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) लक्ष्य केले आहे. ते कर्नाटकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, संघाने ब्रिटिशांना मदत केली.

हेही वाचा : शिवसेनेला धक्का! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं!

सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घ्यायचे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. “माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटिशांना मदत केलेली आहे आणि सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घ्यायचे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भारतीय जनता पार्टी कोठेही नव्हती. हे सत्य भाजपा लपवून ठेवू शकत नाही. काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनीच भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला,” असे राहुल गांधी म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here