Rupali Chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती, गुरुवारी पदभार स्वीकारणार!

Ncp-state-president-rupali-chakankar-was-elected-as-the-chairperson-of-the-womens-commission-official-announcement-from-the-state-government-maha-vikas-aghadi

मुंबई l महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. अखेर अध्यक्षपदावर (Chairperson of State Women Commission) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल राज्य सरकारकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.(Rupali Chakankar chairperson of the State Womens Commission)

आज राज्य सरकारकडून याबद्दल अधिसूचना काढण्यात आली आहे.  रुपाली चाकणकर या उद्या महिला आयोगाच्या अध्यक्षदाचा पदभार स्वीकारणार आहे. अलीकडेच रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवड होणार अशी चर्चा सुरु होती. तेव्हाही चित्रा वाघ यांचा चांगलाच तिळपापड झाला. यावरुन चित्रा वाघ यांनी ट्विट करत ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे.

अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल’ असं वादग्रस्त ट्विट चित्रा वाघ यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर एकच गोंधळ उडाला होता. परंतु, रुपाली चाकणकर यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेरीस आज रुपाली चाकणकर यांची अधिकृत निवड झाली असून उद्या त्या पदभार स्विकारतील. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here