नेपाळ : नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त (Nepal Plane Crash) झालं आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.
पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले आहेत. या विमानातील सर्वजण मृत पावल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. हे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या सेती गंडकी नदीच्या काठावरील जंगलात कोसळलं.
हे विमान अपघातग्रस्त होताच विमानाला भीषण आग लागली. बचाव दलाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या विमानात ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती. अपघाताच्या वेळी विमानात ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता,” अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Nepal PM Pushpa Kamal Dahal ‘Prachanda’, along with Home Minister Rabi Lamichhane to arrive in Pokhara today, in wake of the aircraft crash at Pokhara airport.
A five-member committee has been formed to investigate the reasons for the crash.
Visuals from the spot. pic.twitter.com/nOi5mTh7cF
— ANI (@ANI) January 15, 2023
या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना बचाव कार्यात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.