New Hyundai i20 l नवी ह्युंदाई i20 लाँच

पाहा नवी ह्युंदाई i20 चे फीचर्स आणि किंमत

new-hyundai-i20-launched-in-india-know-the-price-and-features
new-hyundai-i20-launched-in-india-know-the-price-and-features

Hyundai i20 ची भारतात लाँच झाली आहे. भारतात New Hyundai i20 किंमत 6.8 लाखांहून (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. नवीन हॅचबॅक मारुती सुझुकी बलेनो, टाटा अल्ट्रोज, फोक्सवॅगन पोलो, फोर्ड फिगो इत्यादीशी i20ची स्पर्धा आहे. दोन पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटचा पर्याय आहे.  

काय आहे किंमत जाणून घ्या

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या वाहनाच्या पेट्रोल व्हर्जनची किंमत ६.८० लाख ते ११.१७ लाख रुपये आहे. तर डिझेल व्हर्जनची किंमत ८.१९ लाख ते १०.५९ लाख रुपये आहे. या किंमती ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहतील.

ऑर्डर बुंकिंग सुरु

नवीन प्रीमियम हॅचबॅक देखील ग्राहकांना तीन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय प्रदान करते. गेल्या आठवड्यात ह्युंदाईने नवीन व्हर्जन i20 साठी ऑर्डर बुकिंग सुरु केली आहे. ह्युंदाई डीलरशिपचा वापर करून ही कार  21,000 च्या टोकन रकमेवर बुक करता येणार आहे.

पाहा व्हिडीओ

काय आहे विशेष

नव्या ह्युंदाई आय 20 मध्ये ‘सेन्सस स्पोर्टीनेस’ डिझाइन टेनेंट आहे. हे पॅरामीट्रिक ज्वेल पॅटर्नसह एक मोठी कॅस्केडिंग ग्रिल आहे. या ग्रिलला एलईडी डीआरएलसह मोठ्या एलईडी हेडलॅम्प्स बसविल्या आहेत. नवीन ह्युंदाई आय 20 मध्ये एक फ्रंट बम्पर आणि एलईडी फॉग लॅम्प देखील आहे.

हेही वाचा l auhar khan l Bigg Boss विजेती गौहर खानचा 12 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत झाला साखरपुडा

नवीन-आय -20 मध्ये बीएस 6 पॉवरट्रेन पर्याय आहेत. ज्यात 1.5 लिटर डिझेल इंजिनसह 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, अॅडव्हान्स 1.2 कप्पा पेट्रोल आणि आयव्हीटीसह 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि बेस्ट-इन-सेगमेंट समाविष्ट आहे.

1.0 लिटर टर्बो जीडीआय पेट्रोलचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने म्हटले आहे की, ऑल-न्यू आय-20 ही ‘लाइट वेट’ धर्तीवर तयार करण्यात आली आहे. 66 टक्के ‘एडवांस्ड अँड हाय स्ट्रेंथ स्टील’ने बनलेली आय-20 कार ग्राहकांना संपूर्ण सुरक्षा आणि जबरदस्त अनुभव प्रदान करेल. असं कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here