VIDEO : महिंद्राची Mahindra-thar नवी थार जीप लाँच

all-new-Mahindra-thar-launch
all-new-Mahindra-thar-launch

महिंद्रा कंपनीची नवी थार जीप आज लाँच झाली आहे. (new-Mahindra-thar-launch) या कारला टेस्टिंग दरम्यान अनेकदा पाहिले गेले होते. सेकंड जनरेशन मॉडल मध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. कॉस्मॅटिक आणि मॅकॅनिक दोन्ही बाजुने कारमध्ये बदल केलेले आहेत. या गाडीला नवीन बीएस६ इंजिनमध्ये लाँच केले आहे. नवा अवतार धारण केलेल्या या थारच्या दोन मालिका, ‘एएक्स’ व ‘एलएक्स’ आजपासून ग्राहकांना उपलब्ध असणार आहेत.

‘एएक्स’ची प्रारंभिक किंमत 9.80 लाख रुपये आहे, तर ‘एलएक्स’ची प्रारंभिक किंमत 12.49 लाख रुपये आहे. आजपासून थारची विक्री सुरु झाली आहे. महिंद्रा कंपनीच्या या नव्या यएसयुवी थारमध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिले आहे. त्यात पहिला म्हणजे 2.0 लीटर m Stallion TGDi पेट्रोल इंजिन आहे. तर दुसरा 2.2 लीटर mHawk डिझेल इंजिन आहे. यामुळे एसयुवीला जबरदस्त पॉवर मिळण्यास मदत होणार आहे. त्याचसोबत कारमध्ये 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि एक 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचे ऑप्शन दिले आहे.

all-new-Mahindra-thar-launch

‘ऑल-न्यू थार’ मध्ये ही  आहेत वैशिष्ट्ये 

  1. नवीन ‘बीएस-सिक्स’ अनुरुप इंजिनांचे पर्याय : ‘2.0 लिटर एमस्टॅलियन टीजीडीआय पेट्रोल इंजिन’ आणि ‘2.2 लिटर एमहॉक डिझेल इंजिन.’
  2.  ‘ऑल-न्यू था’रमध्ये ‘6 स्पीड स्वयंचलित ट्रान्समिशन’ किंवा ‘6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन’ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. हे दोन्ही ऑथेंटिक 4-बाय-4 ट्रान्सफर केसशी ‘लो रेंज’मध्ये सहज जुळणारे आहेत.
  3.  ‘ऑल-न्यू थार’मध्ये छताचे विविध पर्याय प्रथमच देण्यात आले आहेत. कन्व्हर्टिबल टॉप, हार्ड टॉप किंवा सॉफ्ट टॉप, या तिन्ही प्रकारांमध्ये ही गाडी उपलब्ध आहे.
  4. ऑल-न्यू’ आसनांचे पर्याय : ‘4 फ्रंट-फेसिंग’ सीट्स आणि ‘2+4 साइड-फेसिंग’ सीट्स

all-new-Mahindra-thar-launch

  1. नवीन तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये : ‘ड्रिझल रेझिस्टंट 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम’, ‘क्रूझ कंट्रोल’, ‘अॅडव्हेंचर स्टॅटिस्टिक्स डिस्प्ले’ आणि बरेच काही.
  2. नवीन आरामदायी व सुटसुटीतपणाची वैशिष्ट्ये : ‘स्पोर्टी फ्रंट सीट’, छतावर बसवलेले स्पीकर्स आणि इतर काही.
  3. नवीन सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये : ‘एबीएस + ईबीडी’, ‘ड्युअल एअरबॅग्ज’, ‘इपीएस विथ रोलओव्हर मिटिगशन’, ‘हिल-होल्ड’ व ‘हिल-डिसेंट कंट्रोल’ आणि बरेच काही.

वाचा : पाहा video Google pixel 5, pixel 4A 5G स्मार्टफोन लाँच, 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here