न्यूयॉर्क l फरार हिरे व्यापारी नीरव मोदी Nirav modi याचा भाऊ नेहल मोदीवर जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याच्या कंपनीतील हिरे लंपास केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. नेहलने Nehal modi मल्टिलेअर्ड स्कीमद्वारे 2.6 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 19 कोटी रुपयांचे हिरे लंपास केल्याचा fraud in new york आरोप आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात न्यूयॉर्कमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहल मोदीवर मॅनहट्टन येथील एलएलडी डायमंड्स या कंपनीचे 2.6 मिलियन डॉलर किंमतीचे हिरे लंपास केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून आता नेहल मोदीलाही कोर्टाच्या चकरा माराव्या लागणार आहेत.
नेहलवर फर्स्ट डिग्रीमधील चोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. न्यूयॉर्क येथील कायद्याच्या भाषेत 1 मिलियनपेक्षा अधिक रकमेची चोरी केल्यास त्याला पहिल्या डिग्रीचा आरोप समजला जातो.
नेहलने 2015 पासून या चोरीची सुरुवात केली होती. आधी त्याने एका कंपनीशी हात मिळवणी करून त्याने फेक प्रेझेंटेशन सादर केलं. त्यासाठी 2.6 मिलियन डॉलरचे हिरे त्याने LLD डायमंड्स यूएसएकडून घेतले होते.
याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार 2015 मध्ये नेहलने सुमारे 8,00,000 डॉलर किंमतीचे हिरे देण्यास सांगितले. हे हिरे कॉस्टको होलसेल कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीला विकण्यासाठी दाखवण्यात येणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. कॉस्टको कंपनी त्यांच्या सदस्यांना कमी किंमतीत हिरे विकत असते.
हेही वाचा l भाजपला झटका l RLP शेतकरी आंदोलनावरून एनडीएतून बाहेर, 2 लाख शेतकऱ्यांसह आंदोलनाला पाठिंबा
एलएलडीकडून हिरे मिळाल्यानंतर नेहलने कॉस्टको हे हिरे खरेदी करण्यास तयार असल्याची खोटी माहिती कंपनीला दिली. त्यामुळे एलएलडीने हे हिरे त्याला उधारीवर दिले आणि 90 दिवसांत भरपाई करण्यास सांगितलं.
त्यानंतर नेहलने हे हिरे मॉडल कोलॅट्रल लोन्स कंपनीकडे छोट्या रकमेवर गहाण ठेवले होते. त्यानंतर त्याने एलएलडीला काही रक्कम दिली, पण ही रक्कम हिऱ्यांच्या किंमतीपेक्षा कमी होती.
हेही वाचा l भाजपला झटका l RLP शेतकरी आंदोलनावरून एनडीएतून बाहेर, 2 लाख शेतकऱ्यांसह आंदोलनाला पाठिंबा
हा फ्रॉड बाहेर येईपर्यंत नेहलने हे सर्व हिरे विकून आलेला पैसाही खर्च केला होता, त्यामुळे या कंपनीने अखेर कोर्टात धाव घेतली.