नवी दिल्ली : रस्ते,वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना करोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी. असं आवाहन केलं आहे.
नितीन गडकरी यांनी ट्विट करुन माहिती दिली. म्हणाले, “काल मला अशक्तपणा जाणवत असल्याने डॉक्टरांशी चर्चा केली. तपासणी केली असता मला करोना झाल्याचं स्पष्ट झालं. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसोबत मी सध्या व्यवस्थित आहे. मी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्या आणि प्रोटोकॉल पाळा. सुरक्षित राहा”.