पाटणा l जेडीयूचे नेते नितीश कुमार Nitesh kumar यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड करण्यात आली आहे. नितीश कुमार Nitesh kumar आज सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. नितीश कुमार सोमवारी सकाळी 4.30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Patna: JD(U) Chief Nitish Kumar arrives at Raj Bhavan to stake claim to form the government#Bihar pic.twitter.com/sM4QekdxCK
— ANI (@ANI) November 15, 2020
नितीश कुमार सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज रविवारी पार पडली असून त्यानंतर नितीश कुमार Nitesh kumar यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु उपमुख्यमंत्री कुणाला संधी मिळणार याबाबत अद्यापही एनडीएमध्ये एकमत झालं नाही.
भाजपाला जास्त जागा मिळाल्याने नितीश कुमार Nitesh kumar यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद निसटणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती. भाजपा नेत्यांनी एकीकडे नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट केलं असताना नितीश कुमार यांनी मात्र मौन बाळगलं होतं.
JD(U) Chief Nitish Kumar named as the next Chief Minister of Bihar, in NDA meeting at Patna
Visuals from NDA meeting at Patna, Bihar pic.twitter.com/Xz8Fr0WDw5
— ANI (@ANI) November 15, 2020
यासोबतच आपण मुख्यमंत्रीपदावा दावा केला नसल्याचंही म्हटलं होतं. पण अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार Nitesh kumar यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.
बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंबंधी भाजपा, जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) यांची नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. बिहारमध्ये एनडीएने १२२ जागांसहित बहुमत मिळवलं आहे. भाजपाला ७४ जागा मिळाल्या आहेत.
हेही वाचा l Kishmish l मनुके खाण्याचे आरोग्यास ‘हे’ आहेत फायदे
तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे २०१५ मध्ये ७१ जागा मिळाल्या होत्या तिथे यावेळी ४३ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपाच्या जागा मात्र ५३ वरुन ७४ वर पोहोचल्या. यासोबत भाजपा बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला.