Nokia चा स्मार्टफोन लाँच,पडला तरी स्क्रीन फुटणार नाही, पाण्यात खराब होणार नाही!

nokia-xr20-with-military-grade-build-launched-in-india-know-price-and-specs-news-update
nokia-xr20-with-military-grade-build-launched-in-india-know-price-and-specs-news-update

नोकिया XR20 (Nokia XR20) भारतात लॉन्च करण्यात आला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन मिलिटरी ग्रेड डिझाइनसह येतो. याचा अर्थ असा आहे की हा फोन खूप उच्च आणि खूप कमी तापमानात देखील सुरळीतपणे काम करेल. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन 55 डिग्री ते 20 डिग्री तापमानापर्यंत सुरळीतपणे काम करू शकतो. तसेच, जरी हा फोन 1.8 मीटर उंचीवरून खाली पडला तरी या स्मार्टफोनला काहीही होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच हा फोन एक तासभर पाण्यात पडून राहिला तरी तो खराब होणार नाही. कंपनीचा दावा आहे की, या फोनला चार वर्षे ओएस अपडेट मिळत राहतील.

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट आणि 6.67 इंच फुलएचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्यात प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. हा ड्युअल सिम स्मार्टफोन आहे आणि अँड्रॉइड 11 वर काम करतो. या फोनमध्ये 1,080 × 2,400 पिक्सेल रिझोल्यूशन देण्यात आले आहे. या फोनमध्ये युजर्सना 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल.

Nokia XR20 ची बॅटरी

नोकिया XR20 हा 5G स्मार्टफोन आहे आणि यामध्ये 4630mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जरसह येते. हा फोन आयपी 68 वॉटर रेझिस्टंटसह येतो. यात 4G LTE, Bluetooth, WiFi 6 आणि 5G सह NFC सपोर्ट आहे. तसेच, यात 3.5 मिमी जॅक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, यात साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो बायोमेट्रिक पद्धतीने फोन अनलॉक करण्याचे काम करतो.

नोकिया XR20 ची किंमत आणि लॉन्च ऑफर

नोकिया XR20 ची किंमत 46,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत. 20 ऑक्टोबरपासून हा फोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन ग्रेनाइट आणि अल्ट्रा ब्लू रंगात येतो. त्याची विक्री 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Nokia XR20 चा कॅमेरा सेटअप

Nokia XR20 मध्ये बॅक पॅनेलवर ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, तर 13 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. हा कॅमेरा सेटअप Zeiss ऑप्टिक्ससह येतो. तसेच या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here