Ola Electric Scooter : ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, 36 मिनिटांत होते चार्ज

ola-electric-scooter-in-market-delivery-of-one-hundred-vehicles-on-news-update
ola-electric-scooter-in-market-delivery-of-one-hundred-vehicles-on-news-update

नवी दिल्ली : ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric Scooter) बूक केलेल्या ग्राहकांची प्रतिक्षा संपली आहे. ओलाने बुधवारपासून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणाला सुरुवात केली आहे. कंपनीकडून यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ग्राहकांना स्कूटरचे वितरण करण्यात आले.

ओलाने बुधवारी आपल्या बहुप्रतिक्षीत इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणाला सुरुवात केली आहे. यासाठी ओलाकडून खास अशा वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये 100 ग्राहकांना एस वन आणि एस वन प्रो मॉडेलचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर वरूण दुबे यांनी म्हटले आहे की, आज आमच्या सर्व ग्राहकांसाठी ऐतिहासिक दिवस आहे.

आजपासून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणाची सुरुवात झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणारा जगातील एक प्रमुख देश म्हणून भरताला आम्हाला पुढे आणायचे आहे. वितरणाला सुरुवात झाली आहे. ज्यांनी गाड्या बूक केल्या आहेत, त्यांना लवकरात लवकर त्यांची वाहने मिळावीत यासाठी कंपनी आपल्या उत्पादन वाढीवर भर देत आहे.

18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार

ओलाची ही  इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 18 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. हा चार्जिंग वेळ 75 किलोमीटरची रेंज देण्यासाठी पुरेसा असेल तर स्कूटरची संपूर्ण चार्ज रेंज सुमारे 150 किमी असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. हा दावा खरा ठरल्यास ओलाची ही स्कूटर,  स्कूटर अ‍ॅथर 450X आणि TVS iQube सह इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेमध्ये अधिक मायलेज देऊ शकते.

2022 च्या उन्हाळ्यापर्यंत 15 टक्के स्कूटर करण्याचे लक्ष्य

2022 च्या उन्हाळ्यापर्यंत जगातील 15 टक्के ई-स्कूटर तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य असून, या स्कूटरची निर्यातही कंपनीला करायची आहे. जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करून, ती जनतेला परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे लक्ष असल्याचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here