Maratha quota : मराठा आरक्षणावरून विरोधक राजकारण करताहेत : शरद पवार

vijay-wadettiwar-on-ncp-president-sharad-pawar-ajit-pawar-meeting-bjp-stand-news-update-today
vijay-wadettiwar-on-ncp-president-sharad-pawar-ajit-pawar-meeting-bjp-stand-news-update-today

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरुन विरोधक राजकारण करताहेत. विरोधकांनी आंदोलन करुन काही होणार नाही. हा प्रश्न कोर्टातूनच सुटणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर मी काही बोलू शकत नाही. पण आम्ही पुन्हा एकदा कोर्टात जाणार, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

शरद पवार आज दिल्लीमध्ये माध्यमांशी चर्चा करत असताना विविध विषयावर बोलत होते. केंद्र-राज्य असा वाद नको, कोर्टात जे वकील दिले ते लहान नव्हते, अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही, असं शरद पवार म्हणाले. दिल्लीत बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढायचा निर्णय घेतला, तर मार्ग निघेल. मला त्याबाबत कायदेशीर बाजू माहिती नाही, जर त्याबाबतचा पर्याय निघाला, तर मला वाटतं कोणीही रस्त्यावर उतरणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षणप्रकरणात जे वकील दिले ते ख्यातनाम होते. कपिल सिब्बल किंवा महाधिवक्ते हे ज्युनिअर आहेत का? आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. मला कोर्टाकडून पुन्हा न्याय मिळेल असं वातावरण हवं, हा प्रश्न कोर्टातूनच सुटणार आहे. आम्ही पुन्हा एकदा कोर्टात जाणार, असं शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here