Ashadhi Wari 2021 l रविवारपासून पंढरपुरात संचारबंदी, हजार पोलिसांचा बंदोबस्त!

आषाढी एकादशी यंदाही कोरोनाच्या संकटात होत असताना केवळ 10 मानाच्या पालखी सोहळ्यातील 400 वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार असून इतर वारकऱ्यांनी प्रवेश करू नये यासाठी तब्बल 3 हजार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

pandharpur-ashadhi-wari-2021-curfew-in-pandharpur-and-10-village-from-tomorrow-3-000-police-personnel-for-ekadashi-news-update
pandharpur-ashadhi-wari-2021-curfew-in-pandharpur-and-10-village-from-tomorrow-3-000-police-personnel-for-ekadashi-news-update

पंढरपूर l आषाढी यात्रेसाठी उद्या रविवार पासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात होत असल्याने आज अनेक विठ्ठल भक्तांनी नामदेव पायरी येथे येऊन  दर्शनासाठी गर्दी केली आहे. या आषाढीला दर्शन व्हावे यासाठी हे भाविक नामदेव पायरीचे आणि कळसाचे बाहेरून दर्शन घेऊन परंतु लागले आहेत. उद्यापासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत एसटी आणि खाजगी बससेवा पूर्णपणे बंद असणार आहे.

शहरात केवळ दूध, औषधे आणि पेट्रोल, गॅस एवढीच सेवा सुरु राहणार असल्याने नागरिकांनीही खरेदीसाठी गर्दी केली आहे. उद्या 18 जुलैपासून 25 जुलै पर्यंत पंढरपूर शहरात संचारबंदी असणार असून गोपाळपूर येथील संचारबंदी 24 तारखेला तर इतर 9 गावातील संचारबंदी 22 तारखेला संपणार आहे.

 400 वारकऱ्यांसाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त 

आषाढी एकादशी यंदाही कोरोनाच्या संकटात होत असताना केवळ 10 मानाच्या पालखी सोहळ्यातील 400 वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार असून इतर वारकऱ्यांनी प्रवेश करू नये यासाठी तब्बल 3 हजार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  यंदा कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच बंदोबस्ताला आलेल्या पोलीस अधिकारी यांची कोविड तपासणी करूनच त्यांना बंदोबस्ताचे रिपोर्टींग करू दिले जात असल्याने एकही कोरोनाग्रस्त कर्मचारी बंदोबस्तात असणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे. 

कालपासून बंदोबस्ताला आलेल्या 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यावर केवळ 5 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. हे कर्मचारी सोलापूर , सांगली आणि पुणे भागातील असून त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात हलविण्यात आलेले आहे. या पोलिसांना यात्रा काळात कोरोनाची लागण होऊ नये यासाठी त्यांना कोरोना किट देण्यात आले असून यात मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, ग्लुकोन डी, पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट आणि खाण्यासाठी बिस्किटे आणि चिक्कीची पाकिटे देण्यात आलेली आहेत. 

 हेही वाचा 

“भाजपाच्या गुंडांना शिक्षा झाली पाहिजे”; प्रियांका गांधी संतापल्या…

मोदींच्या सभेत स्वयंसेवकांच्या डोक्यावरच्या काळ्या टोप्याही काढायला लावल्या;शिवसेनेचा निशाणा!

Petrol-Diesel Price Today 17 July l पेट्रोलच्या दरात आज पुन्हा वाढ जाणून घ्या आपल्या शहरातील दर

दानिश सिद्दीकीच्या मृत्यूनंतर तालिबानची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here