Mumbai Rains l गोवंडीत घर कोसळून चौघांचा मृत्यू तर सातजण जखमी

part-of-the-building-in-mumbai-govandi-collapsed-4-people-die
part-of-the-building-in-mumbai-govandi-collapsed-4-people-die

मुंबई l मुसळधार पावसामुळे मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सात जण जखमीही झाले आहेत, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी पहाटे ४.५८ वाजता तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आणखी ७ जण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने बुधवारी मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता, तर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, रायगड, महाराष्ट्रात चार ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावे

नेहा परवेज शेख, वय 35
मोकर झबीर शेख, वय 80
शमशाद शेख, वय 40

जखमींची नावे

परवेज शेख, वय 50
अमिनाबी शेख, वय 60
अमोल धडाई, वय 38
समोल सिंग, वय 25
मोहम्मद फैजल कुरेशी, वय 21
नामरा कुरेशी, वय 17
शाहीना कुरेशी, वय 26

हेही वाचा 

‘’महाराष्ट्रावर संकट, मोदी सरकारने सढळ हाताने मदत करावी”;शिवसेनेची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here