‘पठाण’ पाहू की हनीमूनला जाऊ? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खानने दिलं मजेदार उत्तर

pathaan-actor-shahrukh-khan-answer-to-fan-who-ask-him-question-about-honeymoon-news-update-today
pathaan-actor-shahrukh-khan-answer-to-fan-who-ask-him-question-about-honeymoon-news-update-today

मुंबई: शाहरुख खान (Shahrukh khan) त्याच्या उत्तम अभिनयाबरोबरच हजरजवाबी स्वभावासाठी ओळखला जातो. २५ जानेवारीला शाहरुखची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. ४ वर्षांनंतर या चित्रपटातून शाहरुख खान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. अशात शाहरुख सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रमोशन करताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी #AskSRK सेशन घेतलं होतं. ज्यात एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शाहरुखने मजेदार उत्तर दिलं आहे.

शाहरुख खानने नुकतंच त्याच्या ट्विटरवर #AskSRK सेशन घेतलं होतं. यावेळी त्याने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी एका चाहत्याने त्यालाही अतरंगी प्रश्न विचारला. नेहमीच आपल्या हजरजवाबीपणेने सर्वांची बोलती बंद करणाऱ्या शाहरुखचा हा अंदाज यावेळीही पाहायला मिळाला.

 शाहरुख खान रोमान्सचा बाहदशाह म्हणून ओळखला जातो. अशात #AskSRK सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखला विचारलं, “सर मागच्याच आठवड्यात माझं लग्न झालंय. आधी हनीमूनला जाऊ की ‘पठाण’ पाहू?” चाहत्याच्या अशा अतरंगी प्रश्नावर शाहरुखने उत्तर दिलं, “अरे एक आठवडा झाला. अजून तू हनीमूनला गेला नाहीस? आता बायकोबरोबर जाऊन ‘पठाण’ पाहा आणि मग हनीमूनसाठी जा.”

 दरम्यान ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान जवळपास ४ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तो शेवटचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. आता ‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here