राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू!

patient-dies-whose-eyes-nibbled-by-rat-in-rajawadi-hospital-mumbai-news-update
patient-dies-whose-eyes-nibbled-by-rat-in-rajawadi-hospital-mumbai-news-update

मुंबई : मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आयसीयूमध्ये उपचार सुरु असताना बेशुद्धावस्थेतील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. श्रीनिवास यल्लपा (24) Shrinivas Yallapa यांची बुधवारी रात्री प्राणज्योत मालवली. श्वास घेताना दम लागत असल्यामुळे श्रीनिवास यांना चार दिवसांपूर्वी घाटकोपरमधील महापालिकेच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

 श्रीनिवास यांच्या डोळ्यांचा मंगळवारी उंदराने चावा घेतला होता. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली आहे.

मेंदूज्वर झाल्याने रुग्णालयात उपचार

श्रीनिवास यलप्पाला यांना श्वास घेताना त्रास होत होता. त्रास असह्य झाल्यानंतर रविवारी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मेंदूज्वराचे निदान झाले. तसेच त्यांचे यकृतही बिघडल्याचे समोर आले. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मंगळवारी सकाळी श्रीनिवासच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे त्याच्या नातेवाईकांना दिसले. नातेवाईकांनी निरखून पाहिले असता श्रीनिवासच्या डोळ्यांना उंदराने कुरतडले असल्याचे समजले होते.

हेही वाचा : टेंशन वाढले: महाराष्ट्रात या कारणांमुळे पुन्हा कठोर निर्बंध!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here