मी एजाजबरोबर लिव्ह-इनमध्ये राहिली तरी त्यांना अडचण नाही – पवित्रा पुनिया

pavitra-punia-and-eijaz-khan-s-marriage-pavitra-reveals- is-religion-an-issue
pavitra-punia-and-eijaz-khan-s-marriage-pavitra-reveals- is-religion-an-issue

बिग बॉसच्या १४ व्या Bigg Boss 14 पर्वात अभिनेता एजाज खान Eijaz khan आणि अभिनेत्री पवित्रा पुनिया Pavitra Punia यांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. या दोघांचं बिग बॉसच्या घरात अनेक वेळा भांडणं झालं पण त्यांच्यातल प्रेम काही कमी झालं नाही. या दोघांची लव्ह स्टोरी ही सतत चर्चेत असायची. त्यात या दोघांच्या नात्यात एक गोष्ट सारखी मध्ये येते ती म्हणजे दोघांचे वेगवेगळे धर्म. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पवित्राने धर्मामुळे त्याच्या रिलेशनशिपमध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल सांगितले आहे.

दोघांनी या सगळ्या गोष्टींना नकार दिला होता

एजाज आणि पवित्राची भेट ही बिग बॉसच्या घरात झाली होती. त्यानंतर या दोघांना प्रेम झालं. परंतु सुरुवातीला या दोघांनी या सगळ्या गोष्टींना नकार दिला होता. मात्र, नंतर या दोघांनी एकमेकांवर प्रेम असल्याचे कबूल केले.

पवित्रा पुनियाच्या आईला एजाजच्या धर्मामुळे थोडी चिंता आहे. मात्र, तिच्या वडिलांना यात काहीच अडचण नाही. ‘एजाज आणि माझ्या कुटुंबाला आमच्याबद्दल माहित आहे. एजाजचे भाऊ आणि वडिलांनी आम्हाला बिग बॉसमध्ये पाहिलं आहे. एवढंच नाही तर माझा भाऊ देखील एजाजला ओळखतो. तो माझ्यासोबत असल्यामुळे एजाजला बऱ्याचदा भेटला आहे,’ असं पवित्रा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pavitra Punia (@pavitrapunia_)

देवाच्या कृपेने असा कोणताही मुद्दा येत नाही

पुढे पवित्रा म्हणाली, ‘माझं कुटुंब मोठं आहे. एजाजबद्दल सगळ्यांना माहित आहे. मला वाटतं जर एखादी समस्या असती तर आम्हाला त्याबद्दल समजलं असतं. पण देवाच्या कृपेने असा कोणताही मुद्दा येत नाही. प्रत्येतजण आम्हाला एकमेकांना चांगल ओळखण्यासाठी वेळ देण्याचा सल्ला देत आहेत.’

माझे वडील आनंदात आहेत

आईला एजाजच्या धर्मामुळे काय समस्या आहे या बद्दल पवित्राने पुढे सांगितले. ‘एजाज पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीतून आला आहे. त्यामुळे माझ्या आईला वाटते की आम्ही आधी एकमेकांना चांगलं ओळखायला हवं, एकमेकांना समजून घ्यायला हवं आणि मग निर्णय घ्यायला पाहिजे. तर माझे वडील आनंदात आहेत.

हळूहळू पुढे जायला हवं आणि एकमेकांना खूप वेळ द्यावा

जरी मी लिव्ह-इनमध्ये राहिली तरी त्यांना काही अडचण नाही आहे. पण, कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी त्यांना विचारण हे महत्त्वाचं आहे. एजाजला पण असचं वाटतं आणि त्यांना ठावूक आहे की आम्ही दोघेही वेगवेगळ्या धर्मातून येतो. प्रत्येक व्यक्ती आमच्या रिलेशनशिपमुळे आनंदी आहे. परंतु प्रत्येकाला वाटतं की आम्ही हळूहळू पुढे जायला हवं आणि एकमेकांना खूप वेळ द्यावा.’

हेही वाचा : Ajwain Tea Benefits | ‘ओव्या’चा चहा प्यायल्याने शरीराला होतील ‘हे’ फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here