राष्ट्रवादीची ताकद कशी वाढेल यावर लक्ष द्या, एकमेकांच्या तक्रारी करत बसू नका;जितेंद्र आव्हाडांनी सुनावले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार सवांद मेळावा मिरारोड मध्ये पार पडला यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Mla-ncp-jitendra-awhad-on-thane-politics-5-murders-news-update-today
Mla-ncp-jitendra-awhad-on-thane-politics-5-murders-news-update-today

मीरा भाईंदर : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Dr.jitendra awhad) यांनी कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) ताकद कशी वाढेल यावर लक्ष द्या. सकाळी उठून प्रदेश कार्यलयात जाऊन एकमेकांच्या तक्रारी करत बसू नका. पक्षांनी जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली आहे, त्यांना सोबत घेऊन काम करा अस सज्जड दम नाराज कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार सवांद मेळावा मिरारोड मध्ये पार पडला यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षातील मतभेद बाजूला ठेवून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.

संपुर्ण राज्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पालघर नंतर  मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सवांद साधला यावेळी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मत जाणून घेतले. काही दिवसापूर्वी जिल्हाध्यक्ष पदी काँग्रेस मधून आलेल्या अंकुश मालुसरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे बऱ्याच जुन्या कार्यकर्त्यांनी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर आपली नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा

क्रूझ पार्टीत तो दाढीवाला ड्रग्जमाफिया कोण?;नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना सवाल

स्वीट कपलनवाब मालिकांनी जाहीर केला समीर वानखेडेंचा निकाहनामा

समीर वानखेड़े पर नवाब मलिक का एक और बड़ा आरोप, जारी किया निकाहनामा

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी समजूत काढून जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांची नियुक्ती केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली काम करणे बंधनकारक आहे आता बदल होणार नाही. पक्ष संघटना बळकट करा सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करा असा संदेश जिल्हाध्यक्ष मालुसरे यांना दिला.

शहरातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे त्यावर लवकरच सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून तोडगा काढू व राज्यात महाविकास आघाडी आहे इथे एकत्र लढवण्याचा प्रयन्त करू मात्र शक्य न झाल्यास स्थानिक पातळीवर पक्षांना एकत्र करून येणाऱ्या पालिका निवडणूकीत लढाऊ अस मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here