PCMC Recruitment 2021 l पिंपरी चिंचवड महापालिकेत आरोग्य विभागात भरती, 17 ते 75 हजारांपर्यंत मानधन

pcmc-recruitment-2021-vacancy-for-52-post-in-nhum-news-update
pcmc-recruitment-2021-vacancy-for-52-post-in-nhum-news-update

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेत आरोग्य विभागात 52 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, गुणवत्ता अन्वेषक सहायक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करू शकतात.ही पदं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत असल्यानं त्याचा पिंपरी चिंचवड महापालिकेशी संबंध असणार नाही, असं पालिकेकडून कळवण्यात आलं आहे.

26 नोव्हेंबरला मुलाखती

पिंपरी चिंचवड महापालिकेत आरोग्य विभागात 52 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, गुणवत्ता अन्वेषक सहायक या पदांसाठी 26 नोव्हेंबरला पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं आहे.

थेट मुलाखतीद्वारे निवड

मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचावी, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 17 हजारांपासून 75 हजारांपर्यंत मानधन दिलं जाणार आहे. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा असून संबंधित शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे.

कंत्राटी तत्त्वावर निवड

पिंपरी चिचंवड महापालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत 52 पदांची भरती करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची सेवा ही 31 मार्च 2022 पर्यंत वैध असेल. तर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन पदासाठी कौशल्य चाचणी घेण्यात येईल. ही पदं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत असल्यानं त्याचा पिंपरी चिंचवड महापालिकेशी संबंध असणार नाही, असं पालिकेकडून कळवण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here