”लोकांनाच अर्थव्यवस्थेची काळजी नाही,राजकारणी काळजी का करतील?”: चेतन भगत यांचा सवाल

People don't care about the economy, why should politicians care? ”: Chetan Bhagat's question
People don't care about the economy, why should politicians care? ”: Chetan Bhagat's question

मुंबई : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशावर आर्थिक संकट कोसळलं आहे. यावरुन प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देशातील जनतेच्या बेफिरीबाबत चिंता व्यक्त केली आहे. जर लोकांनाच अर्थव्यवस्थेची काळजी नाही, त्यांनी याबाबत मागणीच केली नाही तर राजकारणी लोक तरी याची काळजी का करतील?” असा सवाल चेतन भगत यांनी केला आहे.

देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. आपले तरुण अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत बसले आहेत. असं मत भगत यांनी व्यक्त केलं.

नागरिकांनी सातत्यानं देशाच्या आर्थिक स्थितीकडं दुर्लक्ष केलं तर देशाची आणखी फरफट होईल, अशी चिंता चेतन भगत यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.

पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या किती मुलांना सुरक्षित नोकऱ्या मिळणार?

“देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. कुठलंही सरकार असू द्या त्यांना माहिती आहे की लोकांना अर्थव्यवस्थेची फिकीर नाही. त्यामुळेच ते देखील अर्थव्यवस्थेतील संकटं दूर करण्यासाठी वेळ खर्च करीत नाहीत. देशातील सध्याच्या ठप्प झालेल्या रोजगाराच्या स्थितीवर बोलताना चेतन भगत म्हणाले, “पुढील वर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या किती मुलांना सुरक्षित नोकऱ्या मिळणार आहेत? एकतर त्यांना बॉलिवूडच्या केसेस सोडवत बसावं लागेल किंवा आपल्याला नोकरी कशी मिळेल? याचा विचार करण्यात त्यांचा वेळ जाईल. असं मत चेतन भगत यांनी व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here