Petrol prices hiked : सलग सहाव्या दिवशीही पेट्रोलचा भडका !

petrol-prices-hiked-for-sixth-consecutive-day-on-Tuesday
petrol-prices-hiked-for-sixth-consecutive-day-on-Tuesday

 नवी दिल्ली : जनता महागाई आणि कोरोनाच्या संकटात होरपळत असताना त्यांना पेट्रोल दरवाढीचा सलग सहाव्या दिवशीही फटका बसला आहे. (petrol-prices-hiked-for-sixth-consecutive-day-on-Tuesday)  इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने मंगळवारी इंधनाचे दर देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ९ ते १० पैसे प्रति लीटरने वाढवले आहेत.

ही दरवाढ मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून लागू झाली असल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ११ पैश्यांनी महाग झालं आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमधील पेट्रोलचे दर ८१.७३ रुपये झाला आहे तर मुंबईत हाच दर ८८.३९ रुपये प्रति लीटरपर्यंत वाढला आहे.

डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मागील नऊ दिवसांमध्ये पेट्रोल १ रुपया ३० पैशांनी महाग झालं आहे. रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतो. सहा वाजल्यापासून नवीन दर लागू होतात.

परदेशी चलनाच्या दराबरोबरच अंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींवर रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर उत्पादन शुल्क, डीलरचा नफा आणि इतर रक्कम जोडली जाते आणि त्यामुळे इंधनाचे दर जवळजवळ दुप्पट होतात.

एका मेसेजवर मिळवा इंधनाचे दर

रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले जातात. इंधनाचे आजचे दर किती आहेत ही माहिती एसएमएसवरही मिळू शकते. इंडियन ऑइलच्या ग्राहकांना RSP लिहून 9224992249 क्रमांकावर मेसेज केल्यावर आणि बीपीसीएलच्या ग्राहकांनी RSP लिहून 9223112222 क्रमांकावर पाठवल्यास त्यांना इंधन दराची माहिती दिली जाते. एचपीसीएलच्या ग्राहकांनी HPPrice लिहून 9222201122 पाठवल्यास त्यांना इंधन दराची माहिती मेसेजवर उपलब्ध होते.

असे आहेत पेट्रोल- डिझेलचे दर

मुंबई – पेट्रोल ८८.३९ रुपये आणि डिझेल ८०.११ रुपये प्रति लिटर

दिल्ली – पेट्रोल ८१.७३ रुपये आणि डिझेल ७३.५६ रुपये प्रति लिटर

पुणे – पेट्रोल ८८.१५ रुपये आणि डिझेल ७८.६७ रुपये प्रति लिटर

नागपूर – पेट्रोल ८८.३४ रुपये आणि डिझेल ७८.८८ रुपये प्रति लिटर

कोलकाता – पेट्रोल ८३.२४ रुपये आणि डिझेल ७७.०६ रुपये प्रति लिटर

चेन्नई – पेट्रोल ८४.७३ रुपये आणि डिझेल ७८.८६ रुपये प्रति लिटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here