PFI Row : कोरोनाकाळात पुणे महापालिकेने घेतली होती PFIची मदत

pfi-row-pune-corporation-contract-in-corona-pandemic-news-update-today
pfi-row-pune-corporation-contract-in-corona-pandemic-news-update-today

पुणे : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या कार्यालयावर छापे टाकल्यानंतर १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर या संस्थेवर राष्ट्रविरोधी कारवायाचा आरोप तपास संस्थांकडून लावण्यात आला. पुणे महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी करार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

कोविड काळात २०२० मध्ये मृतांचा आकडा वाढल्याने मुस्लीम समाजातील व्यक्तीचे दफनविधी करण्यासाठी पालिकेने PFIची मदत घेतली होती. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने जवळपास दोन महिने PFI या संस्थेशी पालिका कनेक्ट होती.

दरम्यान, कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने मुस्लीम व्यक्तींच्या मृतहेदाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने या संस्थेची मदत घेतली होती. महापालिकेत त्यावेळी भाजपची सत्ता होती.

 १३ एप्रिल २०२० रोजी महापालिकेने हा करार केला होता. त्यानंतर २ जून २०२० रोजी हा करार रद्द करण्यात आला होता. ज्यावेळी PFIचा महापालिकेशी करार होता त्यावेळी राझी अहमद खान हा व्यक्ती या संस्थेचे काम पाहत होता. तो सध्या NIAच्या ताब्यात आहे. तर ATS कडून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here