पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

pm-modi-turns-70-rahul-gandhi-wishes
पंतप्रधान मोदींना राहुल गांधीनी दिल्या शुभेच्छा pm-modi-turns-70-rahul-gandhi-wishes

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज गुरुवार (१७ सप्टेंबर) ७० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, भाजपाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा सप्ताह’ आयोजन केले आहे.

राहुल गांधी यांच्या शुभेच्छा

खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजपाकडून देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या प्रमुख राज्यांसह इतर राज्यांमध्येही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. गरजूंना मदत, रक्तदान शिबिरं, नव्या योजनांची सुरुवात, विविध समाजोपयोगी अभियान अशा विविध कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here