SCO Summit 2022: भारताला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवायचंय- PM मोदी

उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

pm-narendra-modi-address-sco-summit-2022-samarkand-said-we-want-to-transform-india-into-manufacturing-hub-news-update-today
pm-narendra-modi-address-sco-summit-2022-samarkand-said-we-want-to-transform-india-into-manufacturing-hub-news-update-today

समरकंद : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी भारताला लवकरच ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवणार असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी  काय म्हणाले?

“जग कोविड-१९ चा सामना करत आहे. कोविड आणि युक्रेनच्या संकटामुळे जागतिक पातळीवर आयात-निर्यातीत अनेक अडचणी निर्माण झाल्यात आहेत. आम्हाला भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज भारतात ७० हजारांहून अधिक स्टार्ट-अप सुरू झाले आहेत. आम्ही विकासावर आमचे लक्ष केंद्रीत करत आहोत. मला आनंद आहे की, भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इतर नेत्यांमध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि व्यापारवाढीवर चर्चा झाली. तत्पूर्वी उझबेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला आरिफॉव्ह आणि समरकंदचे राज्यपाल यांनी पंतप्रधान मोदींचे समरकंदमध्ये स्वागत केले. समरकंदमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेचे दोन सत्र होणार आहेत. पहिल्या सत्रात केवळ शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्य सहभागी होणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये इतर देशांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here