पंतप्रधान मोदींनी केलं आंदोलक शेतकऱ्यांना आवाहन

Pm-modi-will-speak-to-nation-omicron-news-update
Pm-modi-will-speak-to-nation-omicron-news-update

नवी दिल्ली l शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याचा सल्ला केंद्राला दिला. मात्र, तसं केल्यास शेतकरी चर्चेस तयार होणार नसल्याचे नमूद करत केंद्र सरकारने हा सल्ला अमान्य केला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर Narendra Sing tomar यांनी लिहिलेलं पत्र Letter ट्विट tweet केलं असून शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.

नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी पत्र लिहिलं आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह, पियूष गोयल, निर्मला सीतारमन तसंच भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नरेंद्र तोमर यांच्याकडून हे पत्र प्रसिद्द करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र तोमर यांचं हे पत्र ट्विट केलं असून शेतकऱ्यांना ते वाचण्याचं आवाहन केलं आहे.“कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी बंधू भगिणींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नम्रपणे संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. सर्व अन्नदात्यांनी हे पत्र वाचावं असा माझा आग्रह आहे. देशवासीयांना आग्रह आहे की, हे पत्र त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं,” असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पत्रामध्ये केंद्र सरकारने आपण शेतकऱ्यांसोबत खुलेपणाने चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. पण सोबतच विरोधकांच्या अजेंड्याचं मनोरंजन करणार नाही यावरही जोर दिला आहे.

विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करताना सरकारने म्हटलं आहे की, “गेल्या २० ते २५ वर्षात कोणत्याही शेतकरी नेता किंवा संघटनेचं वक्तव्य दाखवा ज्यांनी शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळाला पाहिजे असं म्हटलं आहे”.

नवे कृषी विधेयक शेतकऱ्यांची दलालांमधून मुक्तता करत आपला माल देशातील कोणत्याही बाजारात विकण्याचं स्वातंत्र्य देत असून उत्पन्न वाढवण्यास मदत करणार आहे.

शेतकऱ्यांना मात्र नव्या कायद्यांमुळे कृषी बाजार तसंच सरकारकडून दिली जाणारा हमीभाव यावर संकट येईल याची भीती आहे. पत्रामध्ये शेतकऱ्यांना कृषी बाजार किंला मंडी जिथे त्यांना आपल्या मालासाठी मुलभूत आधार किंमत मिळते ते तसंच राहील असा विश्वास देण्यात आला आहे.

तसंच एपीएमसीला अजून मजबूत करण्याचा प्रयत्न असेल असंही सांगण्यात आलं आहे. आपली जमीन जाईल अशी भीती असणाऱ्या शेतकऱ्यांना उल्लेखून पत्रात सांगण्यात आलं आहे की, “जमिनीची मालकी शेतकऱ्यांकडेच असेल. एक इंच जागाही घेतली जाणार नाही”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here