Sanjay Raut : पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ

sanjay-raut-criticize-rahul-narvekar-over-implementation-of-supreme-court-direction-news-update-today
sanjay-raut-criticize-rahul-narvekar-over-implementation-of-supreme-court-direction-news-update-today

मुंबई : पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ( Patrachawl  Money  laundering  Case) अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे. विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.

काय आहे पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण?

पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या ६७२ कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला ४१४ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली.

मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here