Pooja chavan suicide case l पूजा चव्हाण भाजपा कार्यकर्ता होती; वडिलांचा गौप्यस्फोट

Tiktok-star-pooja-chavan-suicide-case-wanwadi-police-received-post-mortem-report-says-severe-injury-was-the-cause-of-death
Tiktok-star-pooja-chavan-suicide-case-wanwadi-police-received-post-mortem-report-says-severe-injury-was-the-cause-of-death

बीड: पूजा चव्हाणच्या Pooja-chavan कथित आत्महत्या प्रकरणावरुन Suicide case राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपा संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना नवीन माहिती समोर आली आहे. पूजा तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती असा गौप्यस्फोट तिच्या वडिलांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

“पूजावर खूप ताण होता. तिच्या डोक्यावरील कर्ज वाढलं होतं. पोल्ट्री फार्मसाठी तिने कर्ज घेतलं होतं, यामध्ये तिचं खूप मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये काही होणार नाही म्हणून आपण पुण्याला जाऊन दुसरं काही तरी करते असं ती म्हणाली होती,” अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.

कोणी कोणाचं नाव जोडून काहीतरी सांगत आहे

 “आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती,” असंही त्यांनी सांगितलं आहे.पूजा प्रकरणात अनेक नावं येत असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हे सगळं चुकीचं आहे. कोणी कोणाचं नाव जोडून काहीतरी सांगत आहे. हे सगळं थांबलं पाहिजे.

पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे”. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

तिथं कोणी काही विचारत नव्हतं

दरम्यान मंत्र्यांचं नाव जोडलं जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, “मंत्री असो किंवा कोणीही असो तपासाअंती नाव आलं तर कारवाई होईलच. पण सध्या कोणाचं नाव घेऊ शकत नाही”. पुढे त्यांनी सांगितलं की, “पूजाने तीन वर्ष भाजपासाठी काम केलं. तिथं कोणी काही विचारत नव्हतं. काय झालं नेमकं मला माहिती नाही”.

नुसती बदनामी सुरु आहे, पण साधा मला कोणी फोनही केला नाही

“नुसती बदनामी सुरु आहे, पण साधा मला कोणी फोनही केला नाही. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांसोबत तिचे फोटो आहेत. पण कोणीही चौकशीसाठी फोन केला नाही. फक्त बदनामी सुरु आहे. सर्वांना सत्य समोर आल्यावर बोललं पाहिजे,” अशी विनंती त्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मात्र जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here