VIDEO : Poonam Pandey ने लग्न मोडण्याचा घेतला निर्णय

१ सप्टेंबरला अडकली होती लग्नाच्या बेडीत, जो माणूस जनावरासारखं मारहाण करतो काहीही अर्थ नाही

poonam-pandey-decides-to-end-the-marriage
poonam-pandey-decides-to-end-the-marriage

मुंबई : मॉडेल अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिने १ सप्टेंबर रोजी प्रियकर सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. पतीने मारहाण केल्याचा गंभीर आरोप पूनमने आपल्या पतीवर केला आहे. पूनम आता लग्न मोडण्याचा निर्णयापर्यंत पोहचली आहे.

पूनम पांडेने १ सप्टेंबर रोजी प्रियकर सॅम बॉम्बे (Sam Bombay) याच्यासोबत लग्न (Marriage) केलं होतं. मात्र, हनीमूनला (Honeymoon) गेलेले असताना पतीने मारहाण केल्याचा गंभीर आरोप पूनमने आपल्या पतीवर केला आहे.

Poonam Pandey gets married to boyfriend Sam Bombay
Poonam Pandey gets married to boyfriend Sam Bombay

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार पूनम पांडे म्हणाली- ‘मी हे अपमानजनक नातं पुढे सुरु ठेवण्याचं ठरवलं होतं. मला वाटत होतं की, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. पण, आता मी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा l पूनम पांडेंने घटस्फोटाचा निर्णय का घेतला आहे वाचा सविस्तर click करा 

पूनम पांडे हिच्या म्हणण्यानुसार- ‘या अपमानजनक नात्याच्या बंधनात अडकून राहण्याऐवजी मी एकटं राहणं पसंत करेन. जो माणूस जनावरासारखं मारहाण करतो त्याच्याकडे परत जाण्यात काहीही अर्थ नाही. एवढेच नाही तर त्याने माझे केस पकडून मला पलंगावर आपटलं.’

पूनम पांडेच्या पतीला मिळाला जामीन

पूनम पांडे हिचा पती सॅम बॉम्बे याला 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. सॅमला चार दिवसांचा जामीन मंजूर झाला असून, त्याला गोव्याच्या कॅनाकोना पोलीस ठाण्यात हजर व्हावं लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here