नवी दिल्ली l पोस्टात खाते असलेल्यांसाठी ही कामाची बातमी आहे. पोस्ट विभागाने Post Office पोस्ट ऑफिस बचत खात्यात Savings Account किमान शिल्लक रक्कम 500 रुपये Maintain Minimum Balance Of 500 Rupees शिल्लक ठेवणे बंधनकारक केले आहे. अन्यथा देखभाल शुल्क म्हणून आपल्या खात्यातून 100 रुपये वजा केले जाणार आहेत.
भारतीय पोस्ट विभागाने किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अंतिम मुदत जाहीर केली. पोस्ट ऑफिसनुसार 11 डिसेंबर 2020 पर्यंत पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किमान 500 रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत.
आपण आपले खाते बंद होण्यापासून वाचवू इच्छित असल्यास लवकरच आपल्या बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम जमा करा.
भारतीय पोस्ट विभागाने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. भारतीय टपाल विभागाने पोस्ट लिहिले आहे की, 11 डिसेंबर 2020 नंतर, पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू होणारी देखभाल फी टाळण्यासाठी लवकरच तुमच्या खात्यात किमान 500 रुपये जमा करावेत.
अन्यथा आर्थिक वर्षाच्या अखेरीस देखभाल फीच्या नावाखाली खात्यातून 100 रुपये वजा केले जातील.
Now maintaining minimum balance in Post Office Savings Account is mandatory.#MyPostIndiaPost pic.twitter.com/mPuiy3P0Lu
— India Post (@IndiaPostOffice) December 4, 2020
अन्यथा बचत खाते बंद होईल
पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटनुसार आपल्याकडे आर्थिक वर्षाच्या शेवटी बचत खात्यात किमान 500 रुपये शिल्लक Maintaining Minimum Balance नसतील,तर खाते देखभाल शुल्क म्हणून 100 रुपये वजा केले जातील. जर बचत खात्यात जमा केलेली रक्कम शून्य झाली असल्यास ते खाते बंद केले जाईल.
किती व्याज मिळते?
सध्या पोस्ट ऑफिस बचत खात्यातील रकमेवर व्याजदर 4 टक्के आहे, जो बँकांपेक्षा जास्त आहे. दहाव्या आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या दरम्यान किमान शिल्लक रकमेच्या आधारे व्याज मोजले जाते.
भारतीय टपाल विभागाने वेबसाइटनुसार महिन्याच्या दहाव्या आणि शेवटच्या दिवसाच्यादरम्यान जर शिल्लक रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्या महिन्यात कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
कोण खाते उघडू शकते?
पोस्ट ऑफिस बचत खाते एक ज्येष्ठ व्यक्तीद्वारे किंवा दोन ज्येष्ठी व्यक्तींनी संयुक्तपणे किंवा एखाद्या बालकाच्या वतीने किंवा पालकांच्या वतीने उघडता येते.
हेही वाचा l एकटेच लढणार व जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली
10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या नावेसुद्धा खाते उघडले जाऊ शकते. एका व्यक्तीद्वारे केवळ एक पोस्ट ऑफिस बचत खाते उघडता येते.