रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा; बच्चू कडू दानवेंवर संतापले

prahar-sanghatna-bachchu-kadu-on-bjp-raosaheb-danve-farmer-protest
prahar-sanghatna-bachchu-kadu-on-bjp-raosaheb-danve-farmer-protest

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री भाजपा नेते रावसाहेब दानवे Raosaheb danve यांनी धक्कादायक विधान केलं असून शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यमंत्री बच्चू कडू Bachchu kadu यांनी संताप व्यक्त केला आहे. रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा हे तपासावं लागेल असा सवाल केला आहे.

“सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणं शेतकऱ्याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

रावसाहेब दानवेंनी शेतकरी आंदोलनावर केली होती ही टीका 
“हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन china आणि पाकिस्तानचा pakisth हात आहे.

या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा l सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

“त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here