शिवसेनेच्या रणरागिणी कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, प्रताप सरनाईकांची तक्रार

pratap sarnaik- kangana ranaut-sanjay raut-mumbai-anil deshmukh
pratap sarnaik- kangana ranaut-sanjay raut-mumbai-anil deshmukh

मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे,” असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी कंगनावर निशाणा साधला. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं.

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर सर्वच स्तरातून तिच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत तिला इशारा दिला आहे.

उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे,” असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here