PFI वर ED आणि NAI ने केलेल्या कारवाईनंतर प्रकाश आंबेडकरांचे भाजपला चॅलेंज, म्हणाले… 24 तासांत कागदपत्र जनतेसमोर मांडा!

vba-chief-prakash-ambedkar-on-bjp-rss-agenda-plotting-carnage-to-muder-muslim-dalit-news-update
vba-chief-prakash-ambedkar-on-bjp-rss-agenda-plotting-carnage-to-muder-muslim-dalit-news-update

पुणे: पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या विरोधात मोदी सरकारने कारवाई केली आहे. देशभरातील विविध राज्यांत पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कार्यालयांवर ईडी आणि एनआयएने धाडी टाकल्या. या कारवाईत 106 संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईवरुन राजकारण पेटण्याची शक्यता आहे. या कारवाईचे कागदपत्र 24 तासांत जनतेसमोर मांडा असं चॅलेंज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपला (BJP) दिले आहे.

देशभरातील एटीएस आणि एनआयच्या कारवायांवर प्रकाश आंबेडकरांनी टीका केलेली आहे. या कारवाईतील कागदपत्र जनतेसमोर मांडवीत अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

कागदपत्र सादर केली नाही तर जनता हेच समजेल की भाजपचा मुस्लिम विरोधी अजेंडा सुरू आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

गुरुवारी पहाटेपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो असे आंबेडकर म्हणाले.

या धाडी का टाकल्या आहेत? यांच्याविरोधात काय पुरावे होते?आपण जी कागदपत्र गोळा केलेली आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाली? हे या यंत्रणांनी येत्या 24 तासात जनतेसमोर मांडावं असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना केले आहे.

भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा…

तपास यंत्रणांनी 24 तासात कारवाईचा लेखाजोखा मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत असे आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी कारवाईचा लेखाजोखा मांडण्याची मागणी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here