Nana Patole : दुष्काळ जाहीर न झाल्यास दिवाळीत आंदोलन; नाना पटोलेंचा इशारा

A worker who worked with common people is lost!: Nana Patole
A worker who worked with common people is lost!: Nana Patole

नागपूर : अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा न केल्यास ऐन दिवाळीत आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा रुपयाही अजूनपर्यंत मिळालेला नाही, पंचनामे करण्यातही प्रशासन ढिम्म असून आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

राज्यातील शेतक-यांची अवस्था बिकट…

महाविकास आघाडी सरकारने..

अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तातडीने हालचाली करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते. पण, तसे झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्ती ओढवताच तत्काळ दहा हजारांची रोख मदत दिली व नंतर १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आघाडी सरकार येताच पहिला निर्णय शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले. अटी, शर्थी, नियमांचे अडथळे निर्माण करुन शेतकऱ्याला ऑनलाईनच्या रांगेत दिवसरात्र उभे केले नाही. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे पण भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी असल्याने मदतीसाठी हात आखडताच घेतला जातो, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा: MBBS Syllabus In Hindi : एमबीबीएस अभ्यासक्रम प्रथमच हिंदी भाषेतून ; अमित शहांच्या हस्ते पाठयपुस्तकांचे प्रकाशन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here