Pune Rape Case l लग्नाचे आमिष दाखून आतेभावानेच केला बहिणीवर बलात्कार

rape-of-a-disabled-girl-in-buldhana-district
rape-of-a-disabled-girl-in-buldhana-district

पुणे l  पुण्यात भावा-बहिणीच्या Pune Rape Case नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. लग्नाचे आमिष दाखवून आतेभावानेच वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. pune-crime-20-years-old-girl-rape-showing-lure-marriage

पीडित तरुणीची प्रसूती झाल्यानंतर उघडकीस आला प्रकार

या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान हा संपूर्ण प्रकार पीडित तरुणीची प्रसूती झाल्यानंतर उघडकीस आला असून कुटुंबियांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

हेही वाचा l WhatsApp Pay l आता Whatsapp वरुन पैसे करा ट्रान्सफर

20 वर्षीय पीडितेनं पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या दरम्यान तरुणी घरी एकटी असताना गप्पा मारण्याच्या बहाण्याने तो घरी येत होता. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारिरीक संबध ठेवले. दरम्यान या सगळ्या प्रकारातून पीडित तरुणी गर्भवती राहिली.

आतेभावानं घरच्यांना न सांगण्याची दिली धमकी

आतेभावानं घरच्यांना न सांगण्याची धमकी दिल्यानं तरुणीनं घाबरून ही बाबा कुटुंबियांपासून लपवून ठेवली. मात्र 31 ऑक्टोबरला तिची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर या हा सगळा प्रकार समोर आला आणि पीडितेसह कुटुंबियांनी न्याय मागण्यासाठी पोलिसात धाव घेतली.

हेही वाचा l Tiger Shroff l टायगरने शेअर केलं ‘या’ चित्रपटाचं पोस्टर

या प्रकरणी कोळेवाडी इथे राहणारा आरोपी सचिन विठ्ठल झोरे या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. कोथरुड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here