पुणे महापालिकेतील अधिकारी ४० हजारांची लाच घेताना अडकला!

एका शाळेचे दुरुस्तीचे काम फिर्यादीने केले होते. मात्र त्याचे बील अद्याप पर्यंत मिळाले नव्हते. फिर्यादीस आरोपी सुधीर सोनावणे याने ५० हजार रुपये दिल्यास, तुमचे बील पास करून देतो, असे म्हणत लाचेची मागणी केली होती.

pune-municipal-corporation-official-caught-red-handed-while-accepting-bribe-of-rs-40000-news-update
pune-municipal-corporation-official-caught-red-handed-while-accepting-bribe-of-rs-40000-news-update

पुणे l पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना मागील आठवड्यात लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणाची चर्चा राज्यभरात सुरू होती. या घटनेला आठवडा होत नाही. तोवर पुणे महापालिकेतील रस्ते विभागाच्या उपअभियंत्यास आज ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुधीर विठ्ठलराव सोनावणे (वय -५१) असे लाच घेणार्‍या अधिकाऱ्यांचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेचे रस्ते विभाग वर्ग २ मध्ये सुधीर विठ्ठलराव सोनावणे नेमणुकीस होते. २०१८/१९ यावर्षी एका शाळेचे दुरुस्तीचे काम फिर्यादीने केले होते. मात्र त्याचे बील अद्याप पर्यंत मिळाले नव्हते.

फिर्यादीस आरोपी सुधीर सोनावणे याने ५० हजार रुपये दिल्यास, तुमचे बील पास करून देतो, असे म्हणत लाचेची मागणी केली होती. अखेर ४० हजार रुपये देण्याचे ठरले.या संपूर्ण प्रकरणाची माहिती आम्हाला देताच आज आरोपीला ४० हजार रुपये फिर्यादीकडून घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर आरोपी अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here