पुण्यात आग्नितांडव: कारखान्यात भीषण आग, 18 जणांचा बळी!

pune-sanitizer-factory-fire-accident-20-workers-death-stuck-rescue-operation-underway-news-update
pune-sanitizer-factory-fire-accident-20-workers-death-stuck-rescue-operation-underway-news-update

पिरंगुट (पुणे) l पुण्याच्या पिरंगुट MIDC परीसरात एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कारखान्यात संध्याकाळी 5 वाजेदरम्यान भीषण आग लागली. यावेळी कारखान्यात अनेक जण अडकले होते. यापैकी 18 जणांचे मृतदेह सापडले आहे. अदयापही अनेक कर्मचारी  बेपत्ता आहेत. कारखान्यातून निघणारा काळा धुर आजुबाजूच्या परिसरात पसरला आहे. सध्या कारखान्यात अनेक कामगार हे अडकले आहे.Pune-sanitizer-factory-fire-accident-20-workers-death-stuck-rescue-operation-underway-news-update

अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत अनेक मजूर अडकून पडले होते. यापैकी 11 जणांचे मृतदेह सापडले आहेत. भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतदेहांची ओळख पटवणे अवघड झाले आहे.

हेही वाचा : भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न!; सचिन सावंतांचा आरोप

पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आगीत कंपनीतील 37 पैकी 18 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, आग लागलेल्या कंपनीत सॅनिटायझर बनवत असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुपारी अचानक आग लागल्याने बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली असून जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयन्त सुरु असल्याचे समजते. आग नेमकी कशामुळे लागली, ते समजू शकले नाही मात्र, आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : Twitter मोदींच्या राजकीय प्रचाराचा आत्मा होता, आता भाजपचा विरोध का?;शिवसेनेचा सवाल

दरम्यान आतमध्ये अडकलेल्या मध्ये काही महिला कामगारांचा समावेश असल्याचे समजते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली असून, पौड पोलिस आणि संबंधित यंत्रणा आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. हजारो कामगार कामास येत असतात.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here